Pimpri Corona News: 235 नवीन रुग्णांची नोंद, 226 जणांना डिस्चार्ज, 4 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 235 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 91 हजार 750 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 830 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1618 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 667 अशा 2285 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 931 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1085 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. काळेवाडीतील 47 वर्षीय पुरुष, वडमुखवाडीतील 68 वर्षीय पुरुष, भोसरीतील 62 वर्षीय पुरुष आणि महिला चिंचवड मधील 75 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply