Pimpri News: कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस परवानगी नाही

Pimpri News: कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस परवानगी नाही

Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिकरित्या तलाव, नदी किनारी  छटपूजा साजरी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने परवानगी नाकारली आहे.  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आज (बुधवारी) काढलेल्या परिपत्रकात सामूहिक छटपूजा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर भारतीय नागरिकांतर्फे  छटपूजेचे आयोजन केले जाते.  छटपूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक तलाव, नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. मात्र, आता दिवाळी उत्सवानंतर आणि हिवाळा लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पूजेवेळी कोरोनाच्या नियमांचे पालन होणार नाही. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा नदी किणारी अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पूजेला परवानगी देण्यात येणार नाही.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *