Dehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे ऊसतोड कामगारांना किराणा साहित्य भेट
Pckhabar-अभंग प्रतिष्ठान श्रीक्षेत्र देहू यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिवाळीनिमित्त देहू, येलवाडी, सांगुर्डी व काळोखे मळा येथील ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या कुटुंबांना दिवाळीसाठी किराणा साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी एकूण 72 कुटुंबांना किराणा साहित्याची भेट देण्यात आली.

अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलेल्या भेटीचा स्वीकार करीत आजच्या या दिवाळीच्या आनंदी क्षणाला आपली ही भेट आमचा हा सण निश्चितपणे गोड करणारी आहे. अशा भावना यावेळी या ऊसतोड बंधू-भगिनींनी व्यक्त केल्या. याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.










Leave a Reply