Bhosari crime news : बीएमडब्ल्यूवर लघुशंका करताना हटकलं म्हणून सुरक्षारक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Pckhabar- बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत असताना हटकलं म्हणून सुरक्षारक्षकाला रिक्षा चालकाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात सुरक्षारक्षक गंभीर भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शंकर भगवान वायफळकर (४१) असे जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. महेंद्र बाळू कदम (३१, रा बालाजी नगर, भोसरी, एमआयडसी) असे अटक केलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर वायफळे हे सुरक्षारक्षक असून ते एमआयडसीतील कंपनीच्या गेटवर ते कर्तव्य बजावत होते. तेव्हा, आरोपी रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम गेटजवळ कंपनीच्या मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत होता. त्यावेळी शंकर यांनी हटकलं आणि लघुशंका करण्यास मज्जाव केला. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि आरोपी कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला.
मात्र, रिक्षाचालक महेंद्र कदमच्या मनात शंकर यांच्याविषयी राग होता. याच रागातून साडे चार वाजण्याच्या सुमारास बाटलीतून आणलेले पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून जिवंत जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शंकर गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आरोपी महेंद्र बाळू कदम याला पोलिसांनी अटक केली आहे.
भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply