Pimpri news : लायन अशोक येवले यांचा तीन पुरस्काराने गौरव

Pimpri news : लायन अशोक येवले यांचा तीन पुरस्काराने गौरव
Pckhabar- कौशल्य विकास अंतर्गत विविध उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारे लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे कौशल्य विकास उपक्रम प्रमुख लायन अशोक येवले यांना इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234डी 2 च्या वतीने Best Lion of The District, Best contribution as a cabinet  officer, Best Signature Project हे तीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे कौशल्य विकास उपक्रम प्रमुख लायन अशोक येवले यांनी वर्षभर विविध चांगले उपक्रमाचे नियोजन करत ते यशस्वी केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234डी 2  च्या वतीने Best Lion of The District, Best contribution as a cabinet  officer, Best Signature Project हे तीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याबाबत बोलताना लायन अशोक येवले म्हणाले, ‘लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे उपक्रम राबविण्यात मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळेच वर्षभर राबविलेले सर्व उपक्रम यशस्वी झाले. तीन पुरस्काराने आपल्याला गौरविण्यात आल्याने आणखी जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. यापुढील काळातही अधिक चांगले उपक्रम राबविण्यात येतील’, असेही लायन अशोक येवले म्हणाले.

 

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *