Dehu news : देहूगावात नगरपालिका होणार; नगरविकास मंत्र्यांची प्रस्तावावर स्वाक्षरी
Pckhabar- गेल्या अनेक दिवसांपासून देहूकरांची नगरपालिकेची मागणी होत होती. या मागणीचा विचार करता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे देहूगाव ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांत तशी अधिकृत अधिसुचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

देहूगाव येथील ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. देहूगावचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी होत होती. मात्र, याला देहूगावकरांनी तीव्र विरोध केला होता.

तीर्थक्षेत्र देहूगावची सुमारे 35 हजार लोकसंख्या आहे. वाढती लोकसंख्या आणि श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त येतात. नागरी सुविधांचा विचार करता ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये रुपांतर करण्याची मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका करण्याच्या प्रस्तावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या पुढील होणारी निवडणूक नगरपालिकेनुसार होण्याची शक्यता आहे.




बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply