बालदिनानिमित्त अनाथ मुलांना फराळ वाटप

बालदिनानिमित्त अनाथ मुलांना फराळ वाटप 

Pckhabar- आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरा केली जाते. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून  अनाथ मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

“दिवाळीतील एक दिवस विशेष व अनाथ मुलांसाठी ” या उपक्रमांतर्गत चर्च आॅफ ख्राईस्ट या संस्थेतील बाॅईज होममध्ये फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा ऋतुजा बिराजदार व उपाध्यक्ष हिना अत्तार यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, नगरसेवक अमर धुमाळ यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी चर्च आॅफ ख्राईस्टचे सचिव रॉबर्ट गायकवाड,  शशिकांत बिराजदार, राकेश कोंड्रू, मयुर बिराजदार, अरोण कोंड्रू, असीम आत्तार आदी उपस्थित होते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नेते, धोरणी राजकारणी, प्रतिभावंत लेखक म्हणून संपूर्ण जगालाच ज्ञात आहेत. लहान मुलांबद्दल पंडित नेहरूंना विशेष आपुलकी आणि जिव्हाळा होता. यामुळेच त्यांच्या जयंतीदिनी संपूर्ण भारतात ‘बालदिन’ साजरा केला जातो. याच बालदिनाचे औचित्य साधून बाल दिनानिमित्त अनाथ मुलांसाठी फराळ वाटप करण्यात आले.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *