Pimpri news : वादग्रस्त अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग; 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
Pckhabar- अनेक दिवसांपासून पोलीस आयुक्तालयातील रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त मिळाला आहे. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी बदल्यांचा शनिवारी आदेश काढला आहे. वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ अधिकार्यांची उचलबांगडी करून साईड पोस्टींग दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांनी पदभार स्विकारल्यापासून पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. कृष्णप्रकाश यांनी आल्यानंतर प्रथम शहरातील अवैद्य धंद्दे, कायदा व सुव्यवस्थेला महत्त्व दिले. शहरातील अवैध धंद्दे काही प्रमाणात बंद करण्यात आयुक्त यशस्वी झाले आहेत. आयुक्त कृष्णप्रकाश यांनी 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नव्याने दाखल झालेल्या एकाही पोलीस निरीक्षकाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बसविण्यात आले नाही.

शहरात यापूर्वी पोलीस निरीक्षकाचे नाव सध्याची नेमणूक नवीन नेमणुकीचे ठिकाण
भास्कर जाधव नव्याने हजर दरोडा विरोधी पथक, उत्तम तांगडे गुन्हे शाखा युनिट एक खंडणी विरोधी पथक, रामदास इंगवले नव्याने हजर गुन्हे शाखा युनिट पाच, डॉ. संजय तुंगार नव्याने हजर सायबर व तांत्रिक विश्लेषण शाखा, बालाजी सोनटक्के म्हाळुंगे पोलीस चौकी गुन्हे शाखा युनिट एक, विठ्ठल कुबडे चाकण वाहतूक विभाग सामाजिक सुरक्षा विभाग, शिवाजी गवारे भोसरी वाहतूक विभाग व.पो.नि. भोसरी एमआयडीसी पो. ठाणे, ज्ञानेश्वर साबळे नियंत्रण कक्ष व.पो.नि. आळंदी पोलीस ठाणे, बाळकृष्ण सावंत गुन्हे शाखा युनिट पाच व.पो.नि. हिंजवडी पोलीस ठाणे, मोहन शिंदे गुन्हे शाखा युनिट चार व.पो.नि. दिघी पोलीस ठाणे, रवींद्र जाधव व.पो.नि. चिंचवड पोलीस ठाणे नियंत्रण कक्ष, सुधाकर काटे सायबर कक्ष व.पो.नि. चिंचवड पोलीस ठाणे, अरविंद पवार नव्याने हजर म्हाळुंगे पोलीस चौकी, जितेंद्र कदम नव्याने हजर भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे), प्रदीप पाटील नव्याने हजर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे), विलास सोंडे नव्याने हजर निगडी पोलीस ठाणे (गुन्हे), प्रकाश जाधव आळंदी पोलीस ठाणे (गुन्हे) दिघी पोलीस ठाणे (गुन्हे), संतोष पाटील नव्याने हजर वाकड पोलीस ठाणे (गुन्हे), दिलीप भोसले तळवडे वाहतूक विभाग चिखली पोलीस ठाणे (गुन्हे), सुनील गोडसे नव्याने हजर चाकण वाहतूक विभाग, राजेंद्र कुंटे व.पो.नि. एमआयडीसी भोसरी पिंपरी वाहतूक विभाग, सतीश नांदुरकर भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे) सांगवी वाहतूक विभाग, बाळासाहेब तांबे नव्याने हजर निगडी वाहतूक विभाग, सुधीर अस्पत खंडणी/दरोडा विरोधी पथक भोसरी वाहतूक विभाग, वैभव शिंगारे नव्याने हजर तळवडे वाहतूक विभाग, प्रसाद गोकुळे विशेष शाखा गुन्हे शाखा युनिट चार, विवेक लावंड व.पो.नि. दिघी पोलीस ठाणे कल्याण शाखा, रवींद्र चौधर व.पो.नि. आळंदी पोलीस ठाणे विशेष शाखा, अरूण ओंबासे निगडी वाहतूक विभाग नियंत्रण कक्ष, राजेंद्रसिंग गौर नव्याने हजर नियंत्रण कक्ष अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.












Leave a Reply