Bhosari news : पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

Bhosari news : पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

Pckhabar- खेळताना जमिनीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोसरी येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

विराज  मोरे (वय दोन वर्ष, रा. दिघी रोड, भोसरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

विराज याचे वडील प्लंबर असून, आई गृहिणी आहे. ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज यांच्या घराच्या मागील बाजूस ज्ञानेश्वर गवळी यांचा जनावरांचा गोठा आहे. गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी जमिनीलगत पाण्याची टाकी केली आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टाकीला कोणत्याही प्रकारचे झाकण लावलेले नाही. शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास विराज खेळत असताना पाण्याच्या टाकी जवळ गेला. तो पाण्याच्या टाकीत पडला. अर्ध्या तासाने विराज न दिसल्याने त्याच्या वडिलांनी विराजचा शोध घेण्यास सुरुवात केली.

त्यांनी पाण्याच्या टाकीत पाहिले असता त्यात विराज असल्याचे दिसून आले. त्यांनी विराजला त्वरित पाण्याबाहेर काढून पिंपरीतील महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *