Pimpri news : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने ऑटो क्लस्टर येथील कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक

Pimpri news : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने ऑटो क्लस्टर येथील कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक
Pckhabar- ऑटो क्लस्टर कोवीड सेंटर येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन संबंधित मालकाने ऐन दिवाळीच्या तोंडावर थकवले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कामगारांची भेट घेतली. संबंधित मालकास फोन करुन जाब विचारला.

वेतन न दिल्याने कामगार त्या ठिकाणी आंदोलनास बसले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी फोन द्वारे संबंधित मालकाशी संवाद साधला. या वेळी संबंधित मालका द्वारे त्वरित वेतन देण्याचे आश्वासन फोनद्वारे देण्यात आले. वेतन न दिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी – चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष विशाल वाकडकर, उपाध्यक्ष प्रसाद कोलते, सरचिटणीस प्रतीक साळुंके, प्रभाग क्र. १३ अध्यक्ष विष्णू लोखंडे व राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस संदिप पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *