Pimpri Corona News: शहरात आज 172 रुग्णांची नोंद, 135 जणांना डिस्चार्ज, सात मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 172 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 89 हजार 283 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 275 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1558 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 642 अशा 2200 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 658 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1042 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील दोन अशा सात जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड येथील 70, 46 वर्षीय दोन पुरुष, प्राधिकरणातील 64 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 54 वर्षीय महिला, पिंपरीतील 59 वर्षीय महिलेचा आणि पिंपळवंडी येथील 70 वर्षीय महिला, न-हे आंबेगाव खुर्द येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.











Leave a Reply