Pimpri news : कोरोना वारियर्स एसटी कर्मचाऱ्यांचा लायन्सतर्फे सन्मान
Pckhabar-कोरोना साथीच्या काळात एसटीचे कर्मचारी, अधिकारीवर्ग यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरोना योध्यासारखेच कार्य केलेले आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व उचित सन्मान करणे या उद्देशातून लायन्स क्लब पुणे निगडी क्लबने वल्लभनगर एसटी आगारातील अधिकारी वर्ग, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र, दिवाळी अभ्यंगस्नान किट सोबत मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मान करण्यात आला.

लायन्स क्लब निगडीचे अध्यक्ष मारुती मुसमाडे, रिजन चेअरमन सुदाम मोरे, झोनल चेअरमन दिलीप सिंह मोहिते यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, विभागीय लेखाधिकारी संदीप फारणे, आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, स्थानक प्रमुख पल्लवी पाटील व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी लायन्सचे राजीव कुटे व सलीम शिकलगार यांचे सहकार्य लाभले.
रमाकांत गायकवाड यांनी एसटीच्या सद्य परिस्थितीवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लायन्स क्लबचे कौतुक केले कोरोनाच्या या महामारीत दुर्लक्षित राहिलेल्या एसटीच्या कर्मचारी वर्गाची ची दखल लायन्स कडून घेतली गेल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

राजीव कुटे यांनी प्रास्ताविकात लायन्सचे कार्य व कार्यक्रमाचे उद्दिष्ट याविषयी माहिती दिली. पल्लवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण मोहिते यांनी आभार मानले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply