Pimpri Corona News: आज 346 नवीन रुग्णांची नोंद, 534 जणांना डिस्चार्ज, 13 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 322 आणि पालिका हद्दीबाहेरील 24 अशा 346 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 534 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 84 हजार 886 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 80 हजार 280 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1457 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 591 अशा 2048 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2291 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 2 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 11 अशा 13 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात वाकड येथील 78 वर्षीय पुरुष आणि पिंपळेगुरव येथील 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, पालिका हद्दीबाहेरील चाकण येथील 43 वर्षीय पुरुष, हिंजवडी 49 वर्षीय , अहमदनगर 64 वर्षीय, शिक्रापूर 73 वर्षीय, पुणे 63 वर्षीय, नांदेड 75 वर्षीय, सांगली 57 वर्षीय, खेड शिवापूर 60 वर्षीय पुरुष तर तळेगांवदाभाडे येथील 49 वर्षीय महिला, जुन्नर मधील 55 वर्षीय महिला, चाकण येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply