Pimpri news: सार्वजनिक नवरात्र उत्सवाला मुरड घाला, दांडिया, रावण दहनाला परवानगी नाही – आयुक्त हर्डीकर

Pimpri news: सार्वजनिक नवरात्र उत्सवाला मुरड घाला, दांडिया, रावण दहनाला परवानगी नाही – आयुक्त हर्डीकर
Pckhabar- सार्वजनिक ठिकाणच्या नवरात्र उत्सवाला यावर्षी मुरड घालावी. दांडिया, रावण दहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर न राहता काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

 

आयुक्त हर्डीकर म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवाची अंमलबजावणी नियंत्रित केली. विसर्जनासह विविध कार्यक्रम नियंत्रित केले. तरी देखील गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नयनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही.

कोरोना कधीही होऊ शकतो. अनेकांना अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. होऊ नये यासाठी प्रत्येकालाच काळजी घेण्याची गरज आहे. विशेष अथवाने जेष्ठ नागरिक, ज्यांचे वय 65 वर्षांहून अधिक आहे. अन्य दुर्धर आजाराने पीडित आहेत. त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *