Pimpri news: शहरात धुवाधार पाऊस ; विविध भागात तुंबले पाणी

Pimpri news: शहरात धुवाधार पाऊस ; विविध भागात तुंबले पाणी

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराला बुधवारी रात्री परतीच्या पावसाने चांगलेच  झोडपले. काल दुपारपासून कोसळत असलेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत पडत होता. यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, निगडी, प्राधिकरण यासह अनेक भागात पाणी तुंबले होते. काही ठिकातच्या पाण्याचा निचरा झाला आहे. तर, काही भागातील पाणी अद्यापही साचले आहे.

शहरात बुधवारी दुपारपासून मुसळधार पाऊस बरसत होता. रात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी, ओढ्याच्या बाजूच्या घरात, दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. पाणी तुंबून राहिले आहे. पंचशिल बौद्ध विहारच्या पाठीमागील घरात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यात भिजत रात्र काढावी लागली. पाणी तुंबल्याच्या 40 ते 50 तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. अद्यापही अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले आहे.

पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, पिंपरी, वाकड, निगडी, दिघी अशा अनेक भागात पाणी साचले होते. शहरातील 40 भागात पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पालिकेची यंत्रणा रात्रभर फिल्डवर आहे. अनेक भागातील पाण्याचा निचरा झाला आहे. काही भागातील पाणी अद्यापही साचले आहे. ते पाणी काढण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *