Maval news : अतिवृष्टीचा इशारा; भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

 

  Maval news : अतिवृष्टीचा इशारा; भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

Pckhabar- अतिवृष्टी आणि वादळी पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे मावळ तालुक्यातील खरीप भात उत्पादक शेतकरी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय या भीतीने धास्तावले आहेत.

यावर्षी वेळोवेळी पडलेल्या मान्सूनच्या पावसाने मावळ तालुक्यात खरीप भातपीक अतिशय चांगले आले आहे. दाणा भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात वादळाचा आणि अतिवृष्टीचा इशारा जाहीर होताच भात पिकाचे नुकसान होते की काय, अशी भीती पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. या नैसर्गिक संकटाने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

 मावळ तालुक्यात यावर्षी चांगल्या पावसाने 12 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर खरीप भात पिकाच्या लागवडी झालेल्या आहेत. या वर्षी एकूण 104 टक्के भाताची लागवड पूर्ण झालेली असून भात पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात मान्सूनचा  पाऊस झाला. या वर्षी भात पीक जोमात आल्याने शेतकरी वर्ग भात कापणीची वाट पाहत होता. मात्र नुकताच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याने तो सध्या काळजीत पडला आहे.

 सध्या खरीप भात पीक कापणी करण्याच्या अखेरच्या टप्प्यात आलेले असून उघडीप मिळताच भात कापणी वेगाने सुरु करण्याची स्थिती होती. असे असताना हवामान खात्याच्या पावसाच्या संकटाचा इशारा मिळताच संपूर्ण शेतकरी परिवारच चिंताग्रस्त झालेला आहे.

मावळ परिसरात अतिवृष्टी झाल्यास हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान होईल. मावळातील खरीप भातपीक हे मुख्य पीक असल्याने हा धोका शेतकऱ्यांना सहन होणार नसल्याने अनेक जण चिंताग्रस्त आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *