Pimpri news : प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज (बुधवारी) तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हिंगे यांनी राजीनामा दिला आहे.
प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, म्हाडा, संभाजीनगर प्रभागातून तुषार हिंगे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले होते. भाजपने त्यांना क्रीडा समितीचे सभापतीपद देखील दिले होते. सभापती असतानाच 22 नोव्हेंबर 2019 रोजी हिंगे यांना उपमहापौरपद देखील मिळाले. एकाचेवळी त्यांच्याकडे दोनही पदे होती. उपमहापौर होऊन त्यांना 11 महिने पूर्ण झाले होते.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply