Pimpri news : रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५४ जणांनी केले रक्तदान

Pimpri news : शिबिरात ५४ जणांनी केले रक्तदान
पिंपरी : खान्देश मराठा मंडळ व रोटरी क्लब ऑफ़ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ५१ जणांनी रक्तदान केले. ८४ जणांनी प्लाझ्मा दान साठी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या संपूर्ण जग हे कोरोनाशी लढत असताना आपल्या सर्वच रक्तपेढ्या मध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे व कोरोणा महामारी मुळे रक्तदान करण्यास रक्तदाते बाहेर पडण्यास कमी झाले आहेत.

या कसोटीच्या प्रसंगी समाज म्हणुन आपण एकत्रित उभे राहणे महत्त्वाचे आहे म्हणुन आपण सर्व समाज बांधव व मित्र परिवार एकत्रीत येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील रोटरी क्लब ऑफ़ प्राधिकरण च्या अध्यक्षा अदिती जोशी, नगरसेविका शर्मिला बाबर ,अनुराधा गोरखे तसेच रोटरी क्लब चे आरोग्य प्रमुख डॉ.महेश पाटील व रोटरीचे सतिश आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान व प्लाज्मा दान कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खान्देश मराठा मंडळाचे व रोटरी क्लब चे सर्व पदधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.

 

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *