Dehu news : देहूगावकरांचा मिळकत कर माफ करा : शैलाताई खंडागळे
Pckhabar- कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काही जणांच्या 30 ते 50 टक्के वेतन कपात झाली. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ही लाॅकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. देहूकरांचा लाॅकडाऊन कालावधीमधील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सदस्या शैलाताई खंडागळे यांनी केली आहे.
याबाबत खंडागळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देहू येथील बहुसंख्य मिळकत धारक हे मध्यम वर्गासह शेतकरी, कामगार आहेत. कामगार परिसरातील विविध कंपन्यांमध्ये कामाला जातात. शासनाने कोविड संकटामुळे टाळेबंदी जाहीर केल्यामुळे सर्व कंपन्या दोन- तीन महिने बंद होत्या. त्याचा परिणाम बऱ्याच लोकांना पगार मिळाला नाही. तसेच अनेकांची पन्नास टक्के वेतन कपात करण्यात आली होती. या परिस्थिती त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा तसेच मुलांचे शिक्षण याचा खर्च भागविणे कठीण होत आहे.
ज्या मिळकत धारकांचे व्यावसायिक मिळकती आहे अशा मिळकत धारकांना दोन -तीन महिन्याचे भाडे मिळाले नाही.
तर लाॅकडाऊन मुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकताच सहा महिन्याचा मिळकत माफ केला आहे. याच धर्तीवर सामान्य जनतेचा सहानुभूतीने विचार करून देहूगाव ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या सर्व मिळकतीच्या करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी शैलाताई खंडागळे यांनी केली आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply