Dehu news : देहूगावात सिंधूजल सेवेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन

Dehu news : देहूगावात सिंधूजल सेवेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन
Pckhabar-सिंधूजल सेवेच्या माध्यमातून पचपिंड परिवाराने श्रीक्षेत्र देहू पंचक्रोशीतील नागरिकांना अगदी अल्पदरात शुद्ध पाणी मिळावे, या सेवा भावनेतून सिंधू जलसेवा शंभर टक्के शुद्ध पाणी एटीएमच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन  प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आणि स्वातीज सर्च होमिओपॅथिच्या प्रमुख डॉ.स्वाती आसबे यांच्या हस्ते करण्यात आले.

देहू-आळंदी रोड, जैन मंदिरासमोरील ओम साई सोसायटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नारायण पचपिंड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. किशोर यादव आणि स्वातीज सर्च होमिओपॅथिच्या प्रमुख डॉ.स्वाती आसबे म्हणाले, शुद्ध पाण्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव कमी होतो. आरोग्य उत्तम राहते. यामुळे या सिंधू जल सेवेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पाने देहूकरांची आरोग्यसेवा घडत आहे. याशिवाय या कोरोनाच्या संकटकाळात पंचक्रोशीतील नागरिक बंधू-भगिनींना घरपोच शुद्ध पाणी मिळावे व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी सिंधू जलसेवेने केलेली शुद्ध पाण्याची वाहनसेवा ही निश्चितपणे कौतुकास्पद आहे व समाजसेवेचा आदर्श घालून देणारी आहे. अशा शब्दात आदरणीय डॉ.  यादव यांनी हा प्रकल्प सुरू करणाऱ्या नारायण पचपिंड व त्यांच्या परिवाराचे कौतुक केले. प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *