Bhosari news : मंदिरे बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार !

Bhosari news : मंदिरे बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार !

कीर्तन, टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन
Pckhabar- महाविकास आघाडी सरकारने दारु दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरे  अद्याप बंद ठेवली आहेत. मंदिरे बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार अशी टीका भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. आमची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत, अशी मागणी करण्यात आली.
कुदळवाडी येथील श्री दुर्गामाता मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील उपोषणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, दिनेश यादव,  सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका प्रियांका बारसे, राजश्री जायभय, कुंदन गायकवाड, उत्तम बालघरे, बाळासाहेब मोरे, नितीन मोरे, पांडुरंग बालघरे, किशोर लोंढे, बुवा वडेकर, विवेक गुप्ता, दिनेश गुप्ता आदी उपस्थित होते.
तसेच, चिंचवड गाव येथे श्रीमान मोरया गोसावी मंदिराच्या आवारतही आंदोलन करण्यात आले. शहरातील सहा मंदिरांच्या आवारात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, संपूर्ण जगाला भक्तीचा आदर्श देणारा आपला पालखी सोहळा राज्य सरकारच्या सूचनेनुसार रद्द केला. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निर्णयाचा प्रत्येक नागरिकाने आदर ठेवला.  नवरात्रोत्सवापूर्वी राज्यातील मंदिरं खुली करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे लांडगे म्हणाले.
नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं बंद ठेवली आहे. आता नवरात्रोत्सव येत आहे. याकाळात महिला-भगिनींची व्रत असतात. पूजा करायची असते. मात्र, मंदिरंच बंद असल्यामुळे महिलांना नवरात्रोत्सव साजरा करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यात आले आहेत. मग, मंदिरं बंद का ठेवली जात आहेत? असा सवाल उपस्थित करीत महापौर माई ढोरे यांनी सरकारवर टीका केली.  
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *