Dehu news : संजय गांधी निराधार योजनेचे आकुर्डीत कार्यालय सुरू करा; जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांची मागणी

Dehu news : संजय गांधी निराधार योजनेचे आकुर्डीत कार्यालय सुरू करा; जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांची मागणी

Pckhabar- पुण्यात संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे कार्यालय असल्याने पिंपरी चिंचवडसह देहूगाव आदी परिसरातील नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेचे आकुर्डीत कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सदस्या शैलाताई खंडागळे यांनी केली आहे.

याबाबत खंडागळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.

राज्य सरकारमार्फत अंध, दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत समाजातील या वंचितांना आर्थिक मदतीसोबतच इतर प्रकारची मदत करून त्यांना आधार दिला जातो.

पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सदस्या शैलाताई खंडागळे म्हणाल्या, देहूगाव, देहूरोड, चिंचोली, पिंपरी चिंचवड, आकुर्डी या भागातील निराधार महिला, अपंग, वयोवृद्ध, विधवा यांना संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुण्यात जावे लागते. यामुळे लाभार्थ्यांना मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पुण्यात जाणे-येणे शक्य नाही. त्यामुळे आकुर्डीतील अप्पर तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे कार्यालय सुरू करण्यासाठी आपण अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. या मागणीबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहे.

 

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *