Pimpri news : गुरुवारी शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद
Pckhabar- पिंपरी चिचंवड महानगरपालिकेच्या ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीमुळे गुरूवार दि. 15 रोजी सकाळ नंतर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा करण्यात येईल .त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मोशी, डुडुळगाव, चर्होली, वडमुखवाडी इंद्रायणीनगर, भोसरी, संत तुकारामनगर दिघी मॅगझीन या टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. दुसर्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. 16 रोजी होणारा पाणीपुरवठा अनियमित कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply