Pimpri corona News: सात महिन्यानंतर एका दिवसात सर्वात कमी रूग्ण
आज फक्त 252 नवीन रुग्णांची नोंद
609 जणांना डिस्चार्ज, 16 मृत्यू
Pckhabar- मागील पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णवाढीला लागलेला ब्रेक कायम आहे. शहराच्या विविध भागातील 246 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 252 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे.
उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 609 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 84 हजार 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 78 हजार 58 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1441 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 566 अशा 2007 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2554 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 16 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. भोसरी, मोशी,
चिंचवड, पिंपळेगुरव, अजमेरा, घरकूल, तळेगांवदाभाडे, पिंपळगाव, शिरूर, चाकण, बदलापूर, देहूगाव, खेड
येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply