नगरसेवक निखिल भगत म्हणजे ‘जन सेवेसाठी सदैव तत्पर असणारा सच्चा कार्यकर्ता’ !

(कोरोना योद्धा नगरसेवक निखिल भगत यांचा उद्या दि. 12 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त घेतलेला कार्याचा आढावा)

Pckhabar-वडिल बांधकाम व्यावसायिक असले तरी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या इर्षेने वयाच्या अवघ्या अठरा-एकोणिसाव्या वर्षांत हार्डवेअरच्या व्यवसायात उडी… व्यवसाय करत असताना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध…समाजकार्याला सुरूवात…समाजकार्य करत असताना, राजकारणापासून अलिप्त असताना केवळ सर्वपक्षीय मित्रांच्या आग्रहास्तव 2020 मध्ये राजकारणात पर्दापण… वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी 23 जानेवारी 2020 रोजी तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे बिनविरोध नगरसेवक ही यशोगाथा आहे… तरूण उद्योजक आणि नगरसेवक निखिल उल्हास भगत यांची!

शांत, संयमी, मवाळ मितभाषी असलेल्या भगत यांनी जनतेची मनापासून सेवा करून नागरिकांच्या मनात घर केले. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना काळात काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाला कुटुंब मानून भगत यांनी प्रभागाची काळजी घेतली. औषध फवारणी, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केले. महामारीत घाबरून, डगमगून न जाता प्रभागाचे पालकत्व निभावत नेतृत्वगुण सिद्ध केले. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. सर्व वयोगटातील लोकांना त्यांचे आपुलकीने बोलणे भावते.

केवळ राजकारणासाठी नाही तर कोरोनाच्या संकटातही ’माझ्या प्रभागाचा मीच रक्षक’ प्रभागातील नागरिकांची सुरक्षा हीच माझी जबाबदारी आहे, या भावनेने गेल्या सहा ते सात महिन्यापासून प्रभाग क्रमांक-1 तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक निखिल उल्हास भगत यांनी कोरोना योध्दा म्हणून काम केले आहे. कोरोनाच्या संकट काळात प्रभागातील नागरिकांना आपुलकीचा हात आणि आधार दिल्याने त्यांचे प्रभागातील नागरिक कौतूक करत आहेत. कोरोनाविरूध्दच्या लढाईत थेट रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात नगरसेवक निखिल भगत आघाडीवर होते.


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 ब मधील पोटनिवडणुकीत जनसेवा विकास समितीचे उमेदवार निखिल भगत यांची 23 जानेवारी 2020 रोजी बिनविरोध निवड झाली. संदीप शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. भगत यांना तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला. त्यामुळे तळेगाव नगरपरिषदेच्या इतिहासात पोटनिवडणुकीत भगत यांची बिनविरोध निवड झाली. नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी कोरोना या जागतिक महामारीला तळेगावकरांना सामोरे जावे लागले. 6 मे 2020 रोजी तळेगाव स्टेशन येथे एका 34 वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अन् तळेगाव शहर परिसरात खळबळ उडाली. मात्र, प्रभागात कोरोनाचा प्रसार होण्याआधीच निखिल भगत यांनी प्रभागातील नागरिकांची काळजी घेण्यास सुरूवात केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली.


सुरूवातीच्या काळात नागरिकांमध्ये कोरोनाची मोठी भिती होती. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या संकटकाळात आपल्या मतदारराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. या भावनेने प्रभाग क्रमांक-1चे नगरसेवक निखिल भगत यांनी कोरोना योध्दाप्रमाणे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले. जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून अनेक नागरिकांना दोन वेळचे जेवन, अन्नधान्य वाटप केले. लॉकडाऊन कालावधीत भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे प्रभागातील नागरिकांसाठी स्वस्त भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक निखिल भगत यांनी पुढाकार घेतला.


कोरोनाचे रूग्ण सापडणार्‍या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्याबरोबरच दिलासा देण्याचे कामही निखिल भगत यांनी केले. ज्या भागात कोरोना रूग्ण आढळत, त्या भागात भगत जावून नागरिकांशी संवाद साधत. नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढवित. गर्दी होईल त्याठिकाणी जाऊन नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगत होते.

कोरोनामुळे अनेक दिवस लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांसाठी नगरसेवक निखिल भगत यांनी यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ’लॉकडाऊन कट्टा’ हा आगळा-वेगळा ऑनलाईन उपक्रम राबविला. या अंतर्गत तळेगावातील विविध क्षेत्रातील तज्ञाची व्याख्याने, कोरोना संदर्भातील डॉक्टरांचे मार्गदर्शन, योगा, जीम, साहित्य वाचन, हास्यक्लब असे महत्वपुर्ण उपक्रम घेतले.


व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना मदत

कोरोना कालावधीत नगरसेवक निखिल भगत यांनी प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ’हेल्पलाईन’ ग्रुप तयार केला. तपोधाम आणि यशवंतनगर या दोन कॉलनीमधील दोन स्वतंत्र ग्रुप तयार करून सोसायटीमधील प्रत्येक घरातील एक सदस्याला ग्रुपमध्ये घेतले होते. एखाद्या ज्येष्ठाला डॉक्टरांकडे जायचे आहे अथवा अन्य काही मदत हवी असल्यास त्यांना नगरसेवक भगत यांचे कार्यकर्ते मदत करत होते. प्रभागातील विविध नागरी समस्यांसाठी नगरपरिषदेचे अधिकारी, तळेगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. ग्रुपवर समस्या टाकल्यानंतर तात्काळ ती समस्या सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत मार्गी लावली. प्रभागातील नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या, प्रश्न सोडविण्यास भगत यांचे प्राधान्य असते.


कोरोनामुळे नगरपरिषदेची आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने प्रभागात नवीन विकास कामे होत नाहीत. मात्र, भगत यांनी स्वखर्चाने वीरचक्र मित्र मंडळ चौकात ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केले. पेव्हींग ब्लॉक बसविले. ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली. तळेगाव स्टेशन भागात पोस्टाचे कार्यालय नसल्याने ज्येष्ठांना कोरोनाच्या या माहामारीत गाव भागात जावे लागत आहे. यासाठी नगरसेवक भगत सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

 

अवघ्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात नगरसेवक निखिल भगत यांनी प्रभागातील नागरिकांच्या मनात एक उत्साही, जनसामान्यात मिसळून काम करणारा नगरसेवक म्हणून स्थान मिळविले आहे. अशा या जनसेवकाला प्रभाग क्रमांक-1 मधील सर्व नागरिकांच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *