Dehu corona news : देहूगाव परिसरात 10 नवे रुग्ण

Dehu corona news : देहूगाव परिसरात 10 नवे रुग्ण
Pckhabar-देहूगाव परिसरात शनिवारी कोरोनाचे 10 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 781 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 676 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 94 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे.

यामध्ये 59 रुग्णांना लक्षणे नसून 35 रुग्णांना लक्षणे आहेत. 18 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 45 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *