Khed news : खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे निधन

Khed news : खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे निधन

Pckhabar- खेड- आळंदी विधानसभेचे माजी आमदार शिवसेनेचे नेते सुरेश गोरे यांचे शनिवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील रूबी हाॅस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 20 दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

2014 ते 2019 का कालावधीत त्यांनी शिवसेनेकडून खेड- आळंदी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. गोरे यांना वीस दिवसापूर्वी कोरोनाचे निदान झाले होते. सुरूवातीला त्यांनी चाकण येथे उपचार घेतले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *