Article : आयुर्वेदात शस्त्रकर्मे आहेत का?

Article : आयुर्वेदात शस्त्रकर्मे आहेत का?
Pckhabar- उच्च माध्यमिक शाळेत जाणारी एक विद्यार्थीनी एके दिवशी वैधक/ वैद्यकीय संबधी सर्वेक्षणाची, प्रश्नपत्रिका घेऊन माझ्याकडे आली. त्यात एक प्रश्न होता”आयुर्वेदात शस्त्रकर्मे (Surgery) आहेत का?”

आयुर्वेद शास्त्राशी ज्यांचा कधी फारसा संबंध आला नाही, त्या लोकांचा हा नेमीचाच प्रश्न असतो. आयुर्वेद शास्त्रात पूर्वीपासूनच कायचिकित्सा (Medicine) व शल्यचिकित्सा (surgery) या दोन प्रमुख शाखा आहेत. याच दोन शाखा आजच्या ‘अलोपॅथी’ वैद्यकात ही आहेत. आयुर्वेद शास्त्रात”‘चरकसंहिता” हा काय चिकित्सेत तर “सुश्रुत संहिता” हा शल्यचिकित्सामध्ये प्रमुख ग्रंथ आहे.

ऋग्वेद कालीन संस्कृती मध्ये शिकार व युद्धे यांचेच वर्णन अधिक आहे. तसेच मनुष्यास अन्य हिंसक प्राण्यांपासून ही इजा होत असे. त्यामुळे त्यांच्या पासून होणाऱ्या जखमा, हाडांची मोडतोड यांची चिकित्सा करावीच लागत असे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले प्राथमिक ज्ञान ऋग्वेद काळी होते. शरीराच्या अनेक अवयवांची नावे यात आहेत. बृहदाण्यक उपनिषदात शुक्ल, नील, पीत, लोहित या नाड्याचा उल्लेख आहे. याच उपनिषदात हृदयासंबंधी संपूर्ण माहिती असून, त्यावरून लक्षात येते की, त्यावेळी रक्तपरिसंचारणाची (Blood Circulation) पूर्ण कल्पना होती.

अथर्ववेदात मूढगर्भ (मृतगर्भ-still birth) बाहेर कसा काढावा तसेच शलाकेने रोखले गेलेले मूत्र बाहेर कसे काढावे (Urine catheter) याचा उल्लेख आहे.
अश्विनीकुमारानी केलेली काही शस्त्रकर्मे
१)अंध अशा ऋजाता व दिर्घमतस या ऋषी चे शस्त्रकर्म करून त्यांना दृष्टी प्राप्त करून दिली.
२) बहिऱ्या अशा नार्षदाचे शास्त्रकर्म करून त्यास ऐकण्याची शक्ती प्राप्त करून दिली.
३) खेल राजाची पत्नी विरचला हिचा पाय युद्धात तुटला होता. तेथे त्यांनी लोखंडाचा पाय बसवून दिला(Artificial feet).
४) तीन ठिकाणी तुटलेल्या प्रेताला त्यांनी पूर्ववत केले.
५)अत्री या युवकाची अग्नीने भाजलेली त्वचा पुर्ववत केली (cosmetic surgery).
६) भोजप्रतिबंधात भोज राजाच्या कवटीवर कपालच्छेदनाची शस्रक्रिया केल्याचा उल्लेख आहे(craniotomy).

आचार्य सुश्रुताचार्यांचा काळ हा शल्यतंत्राच्या (Surgery) प्रगतीचा काळ मानला जातो.
सुश्रुताचार्यानी शस्त्रकर्मासाठी लागणारी सर्व शस्त्रे निर्जंतुक करण्यासाठी उकळत्या पाण्यात ठेवावीत असे सांगितले आहे. (या साठी पंचवल्कल काढा सर्वात चांगला असून यावर मुंबई विद्यापीठात काम झाले झाले त्याचे निष्कर्ष फार चांगले आहेत.)

जखमाच्या व्रणात वा शस्त्रकर्मा नंतर पू (pus)होऊ नये म्हणून यासाठी काळजी घेण्याबरोबरच ‘रक्षोघ्न धूप’ वापरावा असे सांगितले आहे (Antiseptic).

काही प्रमुख शस्त्रकर्मे
१)ओठ शिवणे(Cleft lip)
२)गालाचे मांस घेऊन कर्णपाली शिवणे.
३)मूत्राशमरी( मूतखडा)-Renal calculus
४)बद्धगुदोदर (Instestinal obstruction)
६)मोतीबिंदू (Cataract)
७)अभ्यंतर विधर्ती (Internal abcess).

८)निरुद्ध प्रकाश(Phimosis)
अशा अनेक शस्त्रकर्मा चा उल्लेख सुश्रुतसंहितेत आहे. त्याकाळी सुध्दा शुक्र वहिनी छेदन (vasectomy) चे शास्त्रकर्म केले जात होते.

अर्वाचीन वैद्यक शास्त्राने ही सुश्रुतचार्यांना पहिला संधान शल्यचिकित्सक (Plastic surgeon) व शस्त्रकर्मांचा पितामह (Father of surgery) मानले आहे. भारतीय शल्यतंत्र योग्य तऱ्हेने विकसित होत राहिले असते, तर ते आजच्या इतकेच प्रगत असते यात शंकाच नाही.
डॉ. अंकुश जाधव
माजी, सहायक संचालक
(वैज्ञानिक-४), केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
नवी मुंबई, इस्लामपूर(सांगली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *