Dehu News : संत जिजाबाई कन्या विद्यालयात पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

Dehu News : संत जिजाबाई कन्या विद्यालयात पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी
Pckhabar-थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 वी जयंती देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयात साजरी करण्यात आली.

शिक्षण महर्षी पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लुटे एस.आर.यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक यादव सर उपशिक्षिका सौ.पवार व्ही. एन. मॅडम, विक्रम काळे व दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार सर उपस्थित होते. शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.

थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दरवर्षी विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विद्यार्थांसाठी विविध स्पर्धा, देहूगाव परिसरातून मिरवणूक काढली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

भाऊराव पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थीनींना व्हावी यासाठी रयत शिक्षण संस्थेमार्फत लिंक देण्यात आली होती. त्यातून विद्यार्थिनींना कर्मवीर अण्णांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. तसेच विद्यालयात जयंतीनिमित्त प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर वकृत्व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लुटे एस.आर. यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *