Mumbai News : मोशीतील सफारी पार्कचा कामाला येणार वेग; उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, राज्यमंत्र्यांची मुंबईत बैठक
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विकास आराखड्यातील मोशीतील सफारी पार्क व मनोरंजन केंद्र या आरक्षणाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी) मुंबईत बैठक घेवून कामाचा आढावा घेतला. यामुळे सफारी पार्क, मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर , महाव्यवस्थापक आशुतोष सलील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मोशी येथील गट नं. (जुना 325) 327 येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/208 मनोरंजन केंद्र, आरक्षण क्रमांक 1/209 अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्रमांक 1/207 सफारी पार्क यासह 12 मीटर व 18 मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मोशीत सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळाली आहे.










Leave a Reply