Haveli News : देहूगाव कोविड सेंटरसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे 100 पीपीई किट भेट

Haveli News : देहूगाव कोविड सेंटरसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे 100 पीपीई किट भेट
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव कोविड केअर सेंटरसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी १०० पीपीई किट मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

देहूगाव येथील अभंग मंगल कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. हवेली तालुका कमिटी अध्यक्ष ह भ प संतोष महाराज काळोखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला देहू ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी वाघमारे सर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष ह भ प मधुकर महाराज मोरे देहूकर, हवेली तालुका पंचायत समिती माजी सभापती हेमलता काळोखे, पुणे जिल्हाप्रमुख ह भ प सुखदेव महाराज ठाकर, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख युवराज दादा शिंदे, पुणे जिल्हा कोषाध्यक्ष भरत वरघडे गुरुजी, महाराष्ट्र वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख ह भ प जालिंदर महाराज काळोखे, ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देहूगाव अध्यक्ष योगेश मोरे, मानवाधिकार नागरी मंचाचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, संत तुकाराम साखर कारखाना संपर्क प्रमुख प्रदिप काळोखे, अभंग मंगल कार्यालयाचे गणेश काळोखे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका दिंडी समिती प्रमुख पोपट महाराज आव्हाळे, हवेली तालुका कमिटी सचिव सचिन उंद्रे यांनी केले. आभार प्रसिद्धीप्रमुख प्रशांत काळोखे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवेली तालुका कमिटी पदाधिकारीचे बापूसाहेब कंद, विलास उंद्रे, मल्हारी गावडे, दादाकाका पिंगळे (गुरूजी), बापूसाहेब कोतवाल, अलका सोनवणे, स्वाती बोडके, सुनिता कुंजीर, निर्मला कांचन, नलिनी गाडे, बाळासाहेब तापकीर, दिपक कांबळे, संतोष बालवडकर, दिनकर भालेकर, गणेश वाळुंज, श्याम महाराज मरगज, संजय तात्या बोडके, उत्तम साठे, विठ्ठल जगताप, विलास काळोखे, सुरेश कांचन, चेतन महाराज शिंदे, बाळासाहेब जावळकर, संतोष बोडके यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *