Pimpri corona News: शहरात आज 655 नवीन रुग्ण, 1122 जणांना डिस्चार्ज तर 31 मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 655 नवीन रुग्ण, 1122 जणांना डिस्चार्ज तर 31 मृत्यू

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 655 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 70 हजार 827 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 70 हजार 827 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 57 हजार 113 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1153 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 385 अशा 1538 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5212 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

शहरातील 11 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 20 अशा 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. शहरातील 11 मृतरुग्णांपैकी आज पाच आणि यापूर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेल्या सहा जणांचा समावेश आहे. त्यात आकुर्डी, भोसरी, थेरगाव, नेहरूनगर, खराळवाडी, निगडी, सांगवी, चाकण, कर्वेनगर, वडगांवशेरी, वारजे माळवाडी, धायरी, खराडी, आंबेगाव, खेड, सोलापूर, कराड, जुन्नर, हडपसर, मुळशी, देहूरोड येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *