Chinchwad News : वाल्हेकरवाडीत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीमेला प्रारंभ

Chinchwad News : वाल्हेकरवाडीत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ला प्रारंभ
Pckhabar- वाल्हेकरवाडी येथील तालेरा रूग्णालया अंतर्गत वाल्हेकरवाडी दवाखान्या मार्फत कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचा प्रारंभ वैद्यकीय डॉ. गीतांजली अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्वेक्षणात बालवाडी शिक्षिका  अनिता महाजन, वैशाली डोंगरे ,गौरी कोल्हापुरे, उमा शिवले, आशा सेविका जयश्री वजाळे, सिस्टर शोभा परदेशी, मनीषा येवले आदी उपस्थित होते.

मोहिमेचा प्रारंभ करताना  डॉ. गीतांजली अवताडे म्हणाल्या, कोरोना नियंत्रण, मृत्यूदर कमी करणे या मोहिमेचा मुख्य उद्देश असून त्या अंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन डॉ.  अवताडे यांनी केले आहे.
                        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *