Dehu news: देहूगाव परिसरात दहा कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, 5 नवे रूग्ण

देहूगाव परिसरात दहा कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, 5 नवे रूग्ण

Pckhabar -देहूगाव परिसरात शुक्रवारी दहा कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पाच नवे रूग्णांची नोंद झाली आहे.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 622 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 538 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

73 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. 13 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 44 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 39 रूग्णांना लक्षणे नसून 34 रुग्णांना लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *