Pckhabar- प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते निगडीत करण्यात आले.
सोशल डिस्टसिंग पाळत पक्षाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य तालुक्यांच्या नियुक्त्यांची औपचारिक घोषणा पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटक नीरज कडू यांनी दिली आहे.
मंत्री बच्चू कडू यांनी पक्ष आणि कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही अशा ठिकाणी पोहोचला पाहिजे. तसेच गरीब, शोषित, अन्यायग्रस्त अशा घटकांसाठी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचे रान करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला पक्षाचे प्रवक्ते अजय महाराज बारस्कर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रा.नंदकिशोर जगदाळे, पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे, नगर जिल्हाध्यक्ष विनोद सिंह परदेशी, शेतकरी संघटना पदाधिकारी संतोष पवार, मंगेश फडके, हवेली तालुकाध्यक्ष महेश कनकोरे, दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे, तुकाराम रणदिवे, बाळासाहेब मराठे, अजिंक्य बारणे, प्रवीण खरात, रामभाऊ कुकडे, संदीप नवले, प्रज्वल जवळकर, नितेश गाडगे, चंद्रकांत उद्गिरे आदी उपस्थित होते.







Leave a Reply