नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास !

नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास !
Pckhabar-
मुंबईतील लालबागच्या राजाची स्थापना इ.स. 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.
त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. 1934 साली होडी वल्हवणावल्हवणाऱ्या या दर्यासारंगाच्या रुपात ‘श्री’ची स्थापना झाली. येथूनच ’नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.

मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे
त्या काळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. 1946 साली ‘श्री’ ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. इ.स. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात ‘श्री’ ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. 1948 महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले. इ.स. 1947 सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. 1948 साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. 1959 साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले.

इ.स. 1958 साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी ‘गीता उपदेश’ आणि ‘कालियामर्दन’ हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *