पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

Pckhabar- चाकण पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी संतोष झेंडे (वय-46) यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

झेंडे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना शुगर आणि बिपीचाही त्रास होता. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 324 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 228 अधिकारी आणि कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर 96 जणांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *