पिंपरी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरणातील पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. शहराने पुराचा कटू अनुभव घेतला होता. गेल्या वर्षी तब्ब्ल 10 हजारांहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले होते. हा अनुभव डोळ्यांसमोर ठेवून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सतर्क ठेवली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, मुळशी धरणातून 18 हजार 48 क्युसेक्स आणि पवना धरणातून 3 ते 4 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्यास पवना आणि इंद्रायणी नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.







Leave a Reply