पवना धरण 98 टक्के भरले; तीन हजार क्युसेसने पवना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार

पवना नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Pckhabar- मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज सकाळी ९ वाजल्यापासून पवना धरणातून तीन हजार क्युसेसने पवना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ८२ मि.मि.

१ जूनपासून झालेला पाऊस = १,५४३ मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = ३,१५४ मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = ९८ टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = १०० टक्के
गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= ३.५६ टक्के

१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ६२.७१ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *