१७ हजारांचा हफ्ता भरता येणार नाही याची काळजी वाटतेय; मग सर्वात महागडा वकील केस कसा लढतोय, सुशांतच्या बहिणीचा रियाला सवाल

१७ हजारांचा हफ्ता भरता येणार नाही याची काळजी वाटतेय; मग सर्वात महागडा वकील केस कसा लढतोय, सुशांतच्या बहिणीचा रियाला सवाल
Pckhabar- दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणात सध्या सीबीआयकडून अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची हिची चौकशी करण्यात येत आहे. पण रियानं चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचं म्हटलं जात आहे. पण रियानं वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर रियानं सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत.

सुशांच्या कुटुंबियांनी खोटे आरोप केल्यामुळं माझं आयुष्य उद्धस्त झाल्याचं रियानं म्हलं आहे. मी सुशांतकडून कधीही पैसै घेतले नाहीत, पैशांचा गैरव्यवहार करण्याचा प्रश्नच नाही असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर रियानं मुंबईतील खार परिसरात एक फ्लॅट खरेदी केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिनं हा फ्लॅट ३०० चौरस फूटांचा असून ५० लाखांचं कर्ज काढल्याचं सांगितलं. तसंच या फ्लॅटचा १७ हजारांचा हफ्ता सुरू असून यापुढं मी हा हफ्ता कसा भरणार माहित नाही, कारण सुशांतच्या कुटुंबियांनी तर माझं आयुष्यचं उद्धस्त केलंय, असं रियानं म्हटलं आहे.

रियाच्या या मुलाखतीवरुन सुशांतची बहिण श्वेतासिंह किर्ती हिनं निशाणा साधला आहे. ‘तुला १७ हजारांचा हफ्ता भरता येणार नाही याची काळजी वाटतेय,पण मला सांगत सर्वात महागडा वकील केस लढतोय, त्यांची फी देणं तुला कसं परवडणार आहे’, असा थेट प्रश्नचं श्वेतानं सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाला विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *