पवना धरण 95 टक्के भरले; पवना नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पवना धरण 95 टक्के भरले; पवना नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Pckhabar- मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर धरणातून पवना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, त्यामुळे काठावरील गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने धरणे भरतील की नाही? अशी शंका असताना ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने पवना धरण 95 टक्के भरले आहे. लवकरच धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. यामुळे नदी पात्रालगत असलेल्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे. नदी तीरावरील सर्व साधनसामुग्री, वाहन व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी आणि जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन शेटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *