कोरोना व स्ट्रेस अर्थात ताण-तणाव: वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा लेख
(भाग-२)
Pckhabar- जगभर पसरलेल्या कोरोनाच्या महासाथीत कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी जगभरा प्रमाणेच भारतात ही चार वेळा लॉकडाउन (ताळेबंदी) केला गेला.या लॉकडाउनच्या काळात जगभरातील लोकां प्रमाणेच भारतातील लोकांमध्ये ही अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या. कोरोनाची भीती, गैरसमज, विविध मार्गांनी येणाऱ्या अफवा, उपायां विषयी चिंता, सुचवले जाणारे विविध उपाय, दडपण, घरातच बसावे लागणे, खर्च इ.अनेक कारणांनी या समस्या वाढत गेल्या. घरगुती भांडणाच्या ही अनेक तक्रारी केल्या गेल्या. परंतु या काळात म्हणजेच प्रामुख्याने एप्रिल ते जून या काळात नक्की काय मानसिक समस्या निर्माण झाल्या, लोकांमध्ये ताण-तणाव,चिंता इ.किती प्रमाणात वाढल्या, नक्की कोणत्या कारणांनी वाढल्या याची पाहणी(सर्व्हे) “युवर दोस्त” या संस्थेने केला. यासाठी त्यांनी ८० हजार लोकांचा इंटरव्ह्यू घेतला. त्यात लिंग, शहर, नोकरी, सद्यस्थिती, व्यवसाय, ते कोणत्या प्रकारचे समुपदेशन घेत आहेत हे मुद्दे त्यांनी मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण करण्यासाठी विचारात घेतले होते.
निष्कर्ष पुढीलप्रमाणे-
१)स्त्रियांत ४३.१ व पुरुषात ५६.९ असे तणावाचे प्रमाण दिसून आले.
२)सर्वेक्षणात चिंतेचे प्रमाण११७टक्के वाढलेले दिसले.
३) शहरानुसार तणावाचे प्रमाण-
मुंबई-४८ टक्के, दिल्ली-३७ टक्के, बेंगळुरू-३५टक्के, चेन्नई-३५टक्के
४)वयानुसार तणावाचे प्रमाण-
१७ ते२०-१५ टक्के, २१ते३०-५३.१टक्क,
३१ ते४०-२१.३ टक्के,
४१ते५०-४.७ टक्के,
५१ते६०-३.६टक्के व
६० वर्षावरील १.५ टक्के.
५)व्यवसायनुसार तणावाचे प्रमाण- विद्यार्थी-३६.१टक्के, गृहिणी-२.२ टक्के, नोकरदार-५२.३ टक्के, उद्योजक-१.७ टक्के, बेरोजगार-३.९ टक्के.
नोकरदार वर्गात” रागाचे’ प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले.
नोकरदारांमध्ये भीती व चिंता
यांचे प्रमाण ४१टक्क्यांनी वाढले, तर एकटेपणा २६ टक्क्यांनी वाढला. विद्यार्थ्यां मध्ये चिडचिड ५२ टक्क्यांनी तर एकटेपणा २६ टक्क्यांनी वाढला.

या काळात पेपर येणे बंद झाले. लोक टी.वी. वरच्या बातम्या पाहत होत होते. टी. वी. वरच्या बातम्यांत कोरोनाच्या बातम्यांचा अतिरेक केला जात होता. वारंवार व्हेंटिलेटर, ऑक्सिजन अशी रुग्णालयातील दृश्ये दाखविली जात होती. एक रुग्ण मिळाला तरी आरडून, ओरडून ब्रेकिंग न्युज दिली जात होती. विविध देशांतील वारंवार दाखविले जाणारे मृत्यूचे आकडे. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मनावर होत होता. या काळात लोक भीती, दडपण, ताण-तणाव या खाली वावरत होते तर आपले पुढे कसे होणार या चिंतेने चिंताग्रस्त होते. कारण लॉकडाउन बद्दल लोकांना कल्पनाच नव्हती या अचानक पणे उद्भवलेल्या परिस्थितीने सर्वच हादरून गेले होते.
त्या काळात लोकांना मोठा फायदा झाला तो मोबाईलचा. संपर्क, वेळ घालविणे, मनोनंजन इ.साठी मोबाईल फार उपयोगी पडला. आता परिस्थितीत खूप बदल झाला आहे. लोक मानसिक दृष्ट्या स्थिर होऊ लागले आहेत.मार्च, एप्रिलच्या मानाने कोरोना ची भीती ही खूप कमी झाली आहे. अजून ही भीती कमी होत राहो.










Leave a Reply