जेईई व नीट परिक्षा तुर्तास स्थगित कराव्यात : युवक काँग्रेसची मागणी
Pckhabar- कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर JEE NEET परीक्षा घेण्याच्या संदर्भातील केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून परिक्षांची तारीख बदलणेबाबतचे निवेदन आज पिंपरी चिंचवड च्या तहसीलदार गिता गायकवाड यांना युवक काँग्रेस शिष्टमंडळाने दिले.
कोरोना काळात केंद्र सरकाराने १३ सप्टेंबर २०२० रोजी JEE, NEET च्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे या संकट समयी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थी ,पालक,शिक्षक यांच्या भावनांशी खेळून त्यांचा जीव धोक्यात घालणे आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत अशा वेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत कसे जाणार, त्यांची राहण्याची व्यवस्था होणे अवघड आहे अशा परिस्थितीत अनेक प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या अविचारी निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. या बाबतची आमची भुमिका केंद्र सरकाराला कळविण्यात यावी ही विनंती, असे निवेदन आज आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयात समक्ष तहसिलदारांना भेटून देण्यात आले.
या प्रसंगी युवक काँग्रेस शिष्टमंडळात
पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यू आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी व चिचंवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे आदि उपस्थित होते.










Leave a Reply