सांगलीतील रमेश पाटील यांच्या घरी पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापना

 

Pckhabar- सांगली जिल्ह्यातील सोनकिरे गावातील रमेश पाटील यांच्या घरी पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पाटील यांच्या घराची गणपतीची मूर्ती मातीची असते. या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा रंग देण्यात येत नाही. ही मूर्ती पाटील परिवारातील सदस्य एकत्र मिळून घरीच तयार करत असतात. मूर्ती घरात तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याची त्यांची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गुरुजींच्या हस्ते विधीवत पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. याच दिवशी शेतात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा नैवैद्य गणपती बाप्पाला दाखवला जातो. अनंत चतुर्दशी दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पाटील परिवाराकडून अनेक वर्षांची ही परंपरा अजूनही जपली गेली आहे.
या गणपतीच्या भोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. यामध्ये विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. गणपतीच्या पाठीमागे अष्टविनायक गणपतीची चित्रे लावण्यात आली आहेत. घरी असलेल्या शोभेच्या वस्तूंनी गणपतीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
या गणपतीच्या दिवसांमध्ये पाटील परिवाराकडून गणपतीची मनोभावे आराधना केली जाते. या दिवसांमध्ये पाटील परिवार एकत्र येऊन घरामध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होत असते, अशी माहिती डॉ. पतंगराव कदम विद्यालय, शिरसगाव च्या शिक्षिका प्रगती पाटील यांनी pckhabar शी बोलताना सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *