इंग्लंडमधील शेफिल्ड शहरातील पाठक परिवाराने जपली गणेशोत्सवाची परंपरा!
Pckhabar- श्रीराम व प्रियंका पाठक हे मूळचे पुण्यातले असून नोकरीनिमित्त इंग्लंडमधील शेफिल्ड या शहरात वास्तव्यास आहे. मात्र, इंग्लंडमध्ये राहूनही पाठक परिवाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात केली आहे.
भारताबाहेर वास्तव्यास असूनही पाठक परिवार मोठ्या उत्साहात भारतीय सण साजरे करतात. पाठक हे दरवर्षी आपल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना परंपरेनुसार करतात. यावर्षी कोरोनाचे सावट असूनही अतिशय उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली. फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यांचाकडे 10 दिवसांचा गणपती असतो. त्यांच्या शेजारी असणारे ओंकार व सोनाली गमे, गोव्याचे शितल, रोहित जवळपास राहणारे सर्व भारतीय मित्र परिवार रोज आरतीसाठी एकत्र येतात. त्यामुळे सर्वांना परदेशात राहूनही पुण्यातच राहत असल्यासारखे वाटते, असे पाठक यांनी सांगितले.
कोरोनाच्या या जागतिक संकटातून जगाला लवकर मुक्त करावे, अशी प्रार्थना पाठक परिवाराने विघ्नहर्ताकडे केली आहे. श्री गणेश या संकटावर मार्ग काढून पुढे येणाऱ्या सणांचा मनमुराद आनंद घेता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.










Uma Mahesh
Superbbbb Shree & Priyanka…gbu guys….Ganpati Bappa Moraya,🌺🙏🏻🥰