पिंपरी- चिंचवड महापालिकेचे  विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी- चिंचवड महापालिकेचे  विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे कोरोना पॉझिटिव्ह

Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज (गुरूवार)  समोर आले आहे.

दरम्यान, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षाचे नेते नामदेव ढाके यांनी आज सकाळी जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनप्रसंगी एकत्र हजेरी लावली होती. त्यावेळी विरोधी पक्ष नेते काटे हे देखील उपस्थित होते.  त्यामुळे  आता आमदार, महापौर, सत्तारूढ पक्षांचे नेते यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर देखील क्वारंटाइन होण्याची वेळ येते की काय हे पहावे लागणार आहे.

विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा आज दुपारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर पुण्यातील नामांकित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांनी कोरोना टेस्ट केली होती. त्याचा अहवाल आज  प्राप्त झाला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *