plasma News: कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन!
Pckhabar-कोरोना बाधीत रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. प्लाझ्मामुळे अनेकांना जीवनदान मिळत आहे. पण, कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येताना दिसून येत नाहीत. दिवसाला प्लाझ्माच्या अनेकबॅगांची आवश्यकता लागते. मात्र, मोजकेच नागरिक प्लाझा दान करण्यासाठी पुढे येत आहेत.
त्यामुळे प्लाझ्मादानबाबत जनजागृतीची गरज आहे. कोरोनामुक्त रुग्णांनी देखील स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्ताद्वारे त्यातील प्लाझ्मा घेतला जातो. संबंधित व्यक्तीच्या शरिरातील अॅण्टीबॉडी तसेच विषाणूंबरोबर लढा देणाऱ्या पेशी म्हणजेच प्लाझ्मा. बरे झालेल्या रुग्णाचे रक्त घेऊन त्या रक्तावर काही प्रक्रिया करत हा प्लाझ्मा वेगळा केला जातो. त्यानंतर अत्यावस्थ किंवा गरज असलेल्या कोरोना बाधीत रुग्णाच्या शरिरात हा प्लाझ्मा सोडला जाते. प्लाझ्माद्वारे संबंधित रुग्णाच्या शरिरातील रोगप्रतिकार शक्ती तसेच कोरोनाच्या विषाणूबरोबर लढणाऱ्या पेशी तयार होतात. त्यामुळे रुग्ण लवकर यातून बरा होतो. प्लाझ्मा थेरपी यशस्वी होताना दिसून येत आहे.
‘या’ रुग्णांवर होते प्लाझ्मा थेरपी
प्लाझ्मा थेरपी ही उपचारपद्धती कोणत्या रुग्णांवर करायची याचा निर्णय डॉक्टर घेत आहेत. जे रुग्ण इतर औषधांना प्रतिसाद देत नाहीत. ज्यांना ऑक्सिजनची गरज अधिक असते, अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी ही उपचार पद्धत वापरली जात आहे. मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी लाभदायी ठरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
याबाबत देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, plasma therapy ही कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी महत्वाचा पर्याय आहे, परंतु दुर्दैवाने अशा दात्यांची संख्या खूप कमी आणि गरजू रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पुढाकार घेऊन , plasma donation साठी नोंदणी करावी ही विनंती.
आपल्या परिचितां पैकी कोणी कोरोनातून बरे झालेले असतील अशा किमान एका व्यक्तीला तरी plasma donation साठी प्रेरित करूया ! किमान एका व्यक्तीचे तरी registration करून घेऊया आणि कोरोना ला आळा घालण्याच्या राष्ट्रीय कामात हातभार लावू या.
Registration link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSetdzJ8gYPJcPGXDsx51ofxGplvbw0JnYw2xdHQPlXcN6DS9g/viewform
ज्यांना प्लाझमा दान करायचा आहे , अशा व्यक्तींनी खालील Whats app लिंकवर क्लिक करून ग्रुपवर जॉईन होऊ शकता.
https://chat.whatsapp.com/DfqC1BpFQ1mGRvnXIf0wrJ असे आवाहन देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.







Leave a Reply