हडपसर येथील जवळकर यांच्या गौरी-गणपतीची आकर्षक  सजावट

हडपसर येथील जवळकर यांच्या गौरी-गणपतीची आकर्षक  सजावट
Pckhabar- हडपसर येथे वास्तव्यास असणाऱ्या मंगल शंकरराव जवळकर यांच्या घरी आकर्षक सजावटीत गौरी-गणपती विराजमान झाले आहेत.

जवळकर यांच्याकडे दरवर्षी गौरी -गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाच्या आगमनाने या उत्सवाला सुरुवात होते. त्यापाठोपाठ गौरी येतात आणि आनंदाला उधाण येते.

गौरी-गणपतींची आरास करायला विशेष आवड असल्याचे   मंगल जवळकर यांनी सांगितले. त्यांना सायली प्रविण जवळकर, तेजस्विता प्रमोद जवळकर आदींनी सजावटीसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *