पुणे-लोणावळा दरम्यान लोकल सुरू करण्याची मागणी

पुणे-लोणावळा दरम्यान लोकल सुरू करण्याची मागणी

Pckhabar- पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे-लोणावळा लोकल सुरू करा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे महामंडळ समिती, मंडळ रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती आणि रेल्वेच्या पुणे विभागीय समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन बैठकीत सदस्य निखील काची यांनी केली.
ही बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, समिती सदस्य राहुल मिश्रा, संदीप बुटाला, सुनील मोदी, सुज्ञा कोपर्डेकर, इक्बाल मुलानी, विश्वनाथ बियाणी, आनंद माने, राजेंद्र दोशी आदी उपस्थित होते.
कनेक्टींग गाड्यांच्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर काढल्याचा प्रकार नुकताच पुणे रेल्वे स्थानकात घडला होता. त्यामुळे प्रवाशांवर स्थानकाबाहेर थांबण्याची वेळ येऊ नये, म्हणून त्यांच्यासाठी प्रतिक्षा खोली अथवा विश्रांती गृहाची उभारणी करण्यात यावी, विमानतळावरच्या धर्तीवर रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा, त्यात प्रवाशांना येण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे आदी विषय काची यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *