अभंग प्रतिष्ठानचे नागरिकांना आवाहन

अभंग प्रतिष्ठानचे नागरिकांना आवाहन
Pckhabar- कोरोनाच्या या वैश्विक संकटामुळे आज सर्व शालेय अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, आजही काही कुटुंबांमध्ये एकच अँड्रॉइड मोबाईल असल्या कारणामुळे वडील नोकरीसाठी बाहेर गेल्यानंतर घरी मोबाईल फोन उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन तासाला बसता येत नाही. त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात एखादा जुना अँड्रॉइड मोबाईल असेल व तो आपल्या वापरात नसेल तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन देहूगाव येथील अभंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

देहू पंचक्रोशीतही काही गरजू कुटुंबातील विद्यार्थी दिसून आले आहेत. अशावेळी आपल्या घरात जर एखादा जुना अँड्रॉइड मोबाईल असेल व तो आपल्या वापरात नसेल तर अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी ती एक सुंदर भेट ठरू शकते. आपणाला अशी भेट द्यायची असेल तर नक्की संपर्क करा. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपल्या मोबाईलची आज नितांत गरज आहे. इच्छुक नागरिकांनी 9881135251/ 9850037635 / 9822286353/9881183555/9881619086/ 9850060072 या मोबाईल नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन अभंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *